Published August 24, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Pintrest
वास्तुशास्त्रानुसार जिन्याखाली देवघर शुभ की अशुभ?
जिन्याखाली देवघर बनविण्याचा तुमचा मानस असेल तर अजिबात करू नका. वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ ठरते
जिन्यावरून पायाने चालताना देवघरावरूनही पाय देऊन जातोय असा अर्थ होतो, त्यामुळे असे अजिबात करू नये
.
वास्तुशास्त्रानुसार, घरात नकारात्मकता येते आणि त्याशिवाय ग्रह दोषही लागतो
जिन्याखाली देवघर केल्यास तुमच्या यशात अडथळे येतात आणि कुटुंबातही शांतता राहत नाही
घरात सतत भांडण होण्याची यामुळे शक्यता निर्माण होते. सुख-शांतता भंग होते
कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे जिन्याखाली देवघर बांधू नये
नेहमी घराच्या पूर्व दिशेला देवघर असावे. तसंच तुमच्या समोर वा वरच्या बाजूला देवघर असावे
वास्तुशास्त्रानुसार ही माहिती देण्यात आली असून कोणताही दावा केलेला नाही