Published Jan 18, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
बॉलिवूड अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या हेल्थमुळे बरीच चर्चेत आहे.
अभिनेत्रीला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले असून तिच्यावर संबंधित उपचार सुरू आहेत.
हिनाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटोज् शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये, हिनाने गुलाबी रंगाच्या को-ओर्ड सेट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची भूरळ चाहत्यांवर पडलीय.
शॉर्ट हेअर, स्मोकी मेकअप आणि पिंक न्यूड लिपस्टिक असा अभिनेत्रीने संपूर्ण लूक केला.
अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक स्टायलिश अंदाजात हटके फोटोशूट केले.
हिना खानने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.