Published Sept 23, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
‘श्रीदेवी’ची कॉपी दिसतेय जान्हवी, क्लासी लुक
जान्हवीने शिमरी ब्लू अँड सिल्व्हर कॉम्बिनेशन साडी दाक्षिणात्य पद्धतीने नेसून सर्वांचे मन जिंकलंय
डार्क आणि लाईट ब्लू कॉम्बिनेशन असणारी शिमरी साडी आणि ब्लाऊज जान्हवीने परिधान केले आहेत
इतकंच नाही तर तिने ब्लाऊजला मागे नॉट देऊन एक प्युअर लुक कॅरी केलाय
.
जान्हवीने यासह गळ्यात नाजूकसा हिऱ्याचा नेकलेस आणि झुमके घालून लुक अधिक क्लासी केलाय
.
यासह तिने सिल्व्हर लुक पूर्ण करत हातात हिऱ्याच्या बांगड्याही घातल्या आहेत
दक्षिणेकडे केसात गजरा तर हवाच, तिने वेणीमध्ये संपूर्ण गजरा माळला असून खूपच सुंदर दिसतेय
जान्हवीने केसांची मधून भांग पाडत साधी वेणी घातली आहे आणि आपल्या आईची चाहत्यांना आठवण करून दिलीये
यासह कपाळावर टिकली लावत तिने भारतीय दाक्षिणात्य भागातील लुक पूर्ण केलाय
यासह जान्हवीने परफेक्ट ग्लॉसी मेकअप केलाय आणि ग्लॉसी न्यूड लिपस्टिक लावली आहे