मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिचा लग्नानंतर पहिलाच चित्रपट रिलीज होतोय.
Picture Credit: Instagram
सध्या पूजा 'आंबट शौकीन' मुळे चर्चेत असून तिने या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटला खास लूक कॅरी केला होता.
चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटवेळी अभिनेत्रीने खास लूक कॅरी करत सर्वांचेच लक्ष वेधले होते.
फ्लोरल प्रिंटेड घागरा कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटोशूट केले होते. सध्या तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.
पूजाने दुपट्टा आणि घागरा असा लूक कॅरी करत एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस तिने दिल्या आहेत.
ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने जबरदस्त फोटोशूट केले.
अभिनेत्रीने मिनीमल ज्वेलरी कॅरी करत आपला लूक पूर्ण केला आहे.
पूजाच्या सौंदर्याचे आणि लूकचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत.
पूजाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.