Published March 08, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे साधेपणातील सौंदर्य चाहत्यांच्या हृदयाचा ठाव घेत असते.
नुकतेच रिंकूने चंदेरी सिल्क साडीमधील काही फोटो शेअर केले असून इंटरनेटवर पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने भुरळ घातली आहे.
रिंकूचा हा लुक पाहून सुंदर दिसण्यासाठी नुसतं ग्लॅमर असण्याची गरज आहे या समजुतीला पूर्णतः रोख लावला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
डार्क मरून चंदेरी सिल्क साडी आणि त्यावर सोनेरी बुट्ट्या असणारे डिझाईन अत्यंत क्लासी आणि रॉयल वाटत आहे.
मराठमोळा लुक करत रिंकूने केसांचा अंबाडा घातला आहे आणि त्यात गजरे माळले आहेत, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडल्याचे दिसून येत आहे
चंदेरी सिल्क साडीसह रिंकूने गळाबंद चोकर घातला असून त्यासह तिने हातात मॅचिंग बांगड्या, अंगठी आणि मॅचिंग कानातले घातले आहेत
कपाळावर मरून टिकली, बेसिक फाऊंडेशन, डार्क काजळ, आयलायनर, डार्क भुवया, हायलायटर आणि ओठांवर ग्लॉसी लिपस्टिक लावत लुक पूर्ण केलाय
रिंकूने प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत आणि त्यापैकी काही फोटो ब्लॅक अँड व्हाईट असून त्यामध्ये तिचा लुक अधिक उठावदार दिसतोय
रिंकूचा हा साज पाहून सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. तिच्या लूकने नेटकऱ्यांचे वेधले असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.