Published Feb 25, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच गुन्हेगारीवर आधारित ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
सई सध्या या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
‘डब्बा कार्टेल’ वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी सईने हटके लूक केला होता.
अभिनेत्रीने स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत एका न्यूज चॅनेलच्या अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती.
ब्लॅक फुल्ल वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत अभिनेत्रीने एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत.
अभिनेत्री कायमच आपली फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
ब्लॅक वेस्टर्न आऊटफिटवर अभिनेत्रीने ऑक्साईड दागिने वेअर करत आपल्या निखळ सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
सईने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.