Written By: Chetan Bodke
Source: Instagram
साडे तीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय्य तृतीया सणाकडे पाहिले जाते.
हा सण हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो.
या सणानिमित्त प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने खास फोटोशूट केले आहे..
स्पृहाने इन्स्टाग्रामवर पिवळ्या रंगाची साडी नेसून कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
पिवळ्या रंगाच्या चिकनकारी साडीवर अभिनेत्रीने व्हाईट कलरचा स्टायलिश ब्लाऊज वेअर केलेला आहे.
रेड कलरच्या बांगड्या आणि डायमंडचे ज्वेलरी असा लूक कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटोशूट तिने केला आहे.
फोटो शेअर करताना अभिनेत्रीने चाहत्यांना अक्षय्य तृतीयेचे शुभेच्छा दिल्या आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये स्पृहा खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची आणि लूकचे चाहते कौतुक करीत आहेत.
स्पृहाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटसचा वर्षाव केला जात आहे.