Written By: Chetan Bodke
Source: Instagram
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कॉमेडी शोच्या माध्यमातून शिवली परब चर्चेत आली.
कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या शिवलीने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोज शेअर केले आहेत.
शिवाली नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते.
काही तासांपूर्वी शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ग्रीन रंगाची साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले.
अभिनेत्रीच्या साध्या साडीने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या दिलखेचक अदांची जोरदार चर्चा होत आहे.
ग्रीन कलरच्या साडीवर व्हाईट कलरच्या फ्लोरल प्रिंट्सने तिच्या लूकची शान वाढवली आहे.
ऑक्साईड दागिने, लूकला मॅचिंग बांगड्या, सिंपल मेकअप आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवली खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची आणि लूकचे चाहते कौतुक करीत आहेत.
शिवलीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटसचा वर्षाव केला जात आहे.