Written By: prajakta Pradhan
Source: Pinterest
सनातन धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी खरेदी करणे फायदेशीर मानले जाते.
पंचांगानुसार बुधवार 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी पूजा पाठ केल्याने जीवनात सुख समृद्धी येते.
अक्षय्य तृतीया तिथीची सुरुवात 29 एप्रिलला संध्याकाळी 5.31 ला होईल. त्याची समाप्ती 30 एप्रिलला दुपारी 2.12 होईल
अक्षय्य तृतीयेला सोन खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबात सुख समृदीचे आगमन होते आणि धन योगाचे लाभ तयार होतात
अक्षय्य तृतीयेला सोन खरेदी करण्यासाठी सकाळी 5.41 ते दुपारी 2.12 पर्यंत शुभ मुहूर्त राहील.
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते. त्याचबरोबर अडकलेले पैसेही परत मिळतात.
अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा करणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीच पैशांची कमतरता भासत नाही.
अक्षय्य तृतीयेची पूजा करताना ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसीद ओम श्री हीं श्री महालक्ष्मयै नमः या मंत्रांचा जप करा.