Alexa झाली आता AI-Powered! भारतात Free मिळतोय हा भन्नाट फीचर

Science Technology

10 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

AI Alexaची भारतात एन्ट्री!

Amazonने भारतात Alexa+ लाँच केली आहे. Generative AIवर आधारित ही नवीन Alexa पूर्वीपेक्षा अधिक नैसर्गिक पद्धतीने संवाद साधते आणि अनेक कामांमध्ये मदत करू शकते.

Picture Credit: amazon

सध्या वापरता येणार Free

Alexa+ सध्या Early Accessमध्ये आहे. या कालावधीत भारतातील ग्राहकांना ती मोफत वापरता येणार आहे. पात्रता तपासण्यासाठी Amazonने स्वतंत्र Early Access पेज उपलब्ध केले आहे.

Picture Credit: pinterest

हिंदी आणि Hinglish सपोर्ट

Alexa+ फक्त इंग्रजीपुरती मर्यादित नाही. भारतात ती English, Hindi आणि Hinglish समजू शकते. एका वाक्यात भाषा बदलली तरी संवादाचा संदर्भ समजून घेण्यासाठी ती तयार करण्यात आली आहे.

Picture Credit: pinterest

वारंवार “Alexa” म्हणण्याची गरज नाही

नवीन Alexaसोबत संभाषण अधिक नैसर्गिक होणार आहे. Follow-up प्रश्न विचारताना प्रत्येक वेळी पुन्हा “Alexa” म्हणण्याची गरज नसते आणि विषय बदलतानाही ती संदर्भ लक्षात ठेवू शकते.

Picture Credit: pinterest

Smart Homeवरही कंट्रोल

घरातील compatible smart devicesना Alexa+च्या मदतीने नियंत्रित करता येते. Lights, appliances आणि इतर smart-home उपकरणांसाठी एकाच voice requestमधून अनेक कामे करण्याची क्षमता देण्यात आली आहे.

Picture Credit: pinterest

Shopping आणि Meal Planning

Alexa+ तुमच्या दैनंदिन कामांमध्येही मदत करू शकते. Shopping list तयार करणे, meal planning, recipes शोधणे आणि music किंवा entertainmentसाठी recommendations देणे अशी कामे करता येतात.

Picture Credit: pinterest

भारतासाठी खास बनवली

Alexa+ भारतीय वापराची पद्धत लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. ‘ढाई बजे’, ‘एक पाव’ यांसारख्या शब्दांपासून भारतीय नातेसंबंधांच्या संज्ञांपर्यंत विविध संदर्भ समजण्यावर Amazonने भर दिला आहे.

Picture Credit: pinterest

पुढे आणखी फीचर्स

Amazonनुसार Alexa+मध्ये पुढे restaurant reservations, travel planning/booking आणि food deliveryसारख्या सुविधा येणार आहेत. भारतातील विविध servicesसोबत integration देखील वाढवले जाणार आहे.

Picture Credit: pinterest

Free कायम राहणार का?

Early Accessनंतर Prime सदस्यांसाठी Alexa+ कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध राहणार आहे. Prime Lite, Prime Shopping Edition आणि Non-Prime ग्राहकांसाठी standalone subscription ₹2,000/महिना असेल किंवा Prime planद्वारे access मिळेल.

Picture Credit: pinterest