iPhone 18 Pro हवा? आता ऑर्डर केल्यानंतर 10 मिनिटांत डिलिव्हरी!

Science Technology

10 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

iPhone 18 Pro आता 10 मिनिटांत घरपोच!

Apple Storeच्या रांगा सोडा; निवडक शहरांमध्ये Quick Commerceवरून iPhone 18 Pro आणि Pro Max काही मिनिटांत मिळत आहेत.

Picture Credit: apple

नेमकं काय घडलं?

18 सप्टेंबरपासून भारतात iPhone 18 Pro आणि Pro Maxची विक्री सुरू झाली. याच दिवशी Quick Commerce प्लॅटफॉर्मनेही या फोनची डिलिव्हरी सुरू केली.

Picture Credit: apple

कुठून मिळणार?

निवडक शहरांमध्ये Blinkit, Zepto आणि Swiggy Instamartवर iPhone 18 Pro सीरीज लिस्ट करण्यात आली आहे. मात्र प्रत्येक परिसरात स्टॉक उपलब्ध असेलच असे नाही.

Picture Credit: apple

किती वेळात डिलिव्हरी?

काही ठिकाणी 10 मिनिटांच्या आसपास डिलिव्हरी उपलब्ध आहे. मात्र तुमचा पिनकोड, उपलब्ध स्टॉक, रंग आणि स्टोरेज व्हेरिएंटनुसार वेळ बदलू शकतो.

Picture Credit: apple

iPhone 18 Pro ची किंमत

iPhone 18 Proच्या 256GB व्हेरिएंटची भारतातील सुरुवातीची किंमत ₹1,64,900 आहे. टॉप 2TB व्हेरिएंटची किंमत ₹3,14,900 पर्यंत जाते.

Picture Credit: apple

Pro Max कितीला?

iPhone 18 Pro Maxची सुरुवातीची किंमत ₹1,79,900 आहे. 2TB व्हेरिएंटसाठी किंमत ₹3,29,900 पर्यंत जाते.

Picture Credit: apple

कॅमेरात मोठं अपग्रेड

iPhone 18 Proमध्ये 48MP Fusion Main Camera आणि Variable Aperture देण्यात आला आहे. यामुळे कमी प्रकाशात फोटो आणि व्हिडिओसाठी कॅमेरा क्षमतांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

Picture Credit: apple

ऑफर्सही मिळणार

Appleच्या माहितीनुसार पात्र कार्डवर निवडक iPhone मॉडेल्ससाठी ₹7,000 पर्यंत Instant Cashback आणि No-Cost EMIचा पर्याय उपलब्ध आहे.

Picture Credit: apple

ऑर्डर करण्यापूर्वी हे तपासा

ऑर्डर करण्यापूर्वी मॉडेल, स्टोरेज, रंग, किंमत, इनव्हॉइस, वॉरंटी आणि Return Policy नक्की तपासा. Premium फोन असल्याने चुकीचा व्हेरिएंट निवडला जाणार नाही याची काळजी घ्या.

Picture Credit: apple

End

iPhone 18 Pro आता दुकानात जाऊन घेण्यासोबतच Quick Commerceमधूनही मिळत आहे. मात्र ही सुविधा निवडक शहरांमध्ये आणि उपलब्ध स्टॉकनुसार आहे.

Picture Credit: apple