Written By: Chetan Bodke
Source: Instagram
अभिनेत्री आलिया भट्ट सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
एकापेक्षा एक चित्रपट आणि तिने साकारलेल्या भूमिका यामुळे आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर असलेली पाहायला मिळत आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या आलियाने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
आलियाने नुकतंच 'मेक माय ट्रीप' या ट्रॅव्हलिंग ॲपच्या एका इव्हेंटला उपस्थिती लावली होती.
त्या इव्हेंटदरम्यान अभिनेत्रीने स्टायलिश फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये आलियाने ग्रे कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर केला आहे.
ग्रे कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट आणि कोट वेअर करत अभिनेत्रीने फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
अभिनेत्रीच्या मेकअपचे आणि लूकचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात आहे.