प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Picture Credit: Instagram
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी आलिया सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे..
आलियाने Cannes film festival 2025 मध्ये दणक्यात पदार्पण केले असून तिचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कान्स फेस्टिव्हलसाठी आलिया दररोज स्पेशल लूक कॅरी करताना दिसते. त्याचे फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.
आलियाने कान्स फेस्टिव्हलसाठी गुचीने डिझाईन केलेली क्रिस्टल साडी नेसली होती.
अभिनेत्रीच्या फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले असून तिच्या लूकचे नेटकरी कौतुक करीत आहेत.
आलियाच्या साडीत स्वारोवस्की क्रिस्टल्स होते, ज्यावर अभिनेत्रीने मॅचिंग नेकलेस आणि कर्णफुले घातली होती आणि केस मोकळे ठेवले होते.
आलिया रेड कार्पेटवर पोहोचताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. क्रिस्टल साडीचा लूक रिया कपूरने तिला स्टाईल केले होते.
आलियाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.