Published Oct 23, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
कोरफड जेलसह कॉफी फेसमास्क करेल त्वचा अधिक उजळ
त्वचा चांगली दिसण्यासाठी पार्लरमध्ये जास्त खर्च करण्याची गरज नाही. घरीच तुम्ही Glowing Skin मिळवू शकता
कॉफी आणि कोरफड जेलचा वापर करून तुम्ही घरगुती फेसमास्क तयार करा आणि त्वचा अधिक उजळ करा
या दोन्ही पदार्थात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असून अँटीएजिंग गुणही आहेत. या फेसमास्कने तुमच्या त्वचेच्या समस्या सुटू शकतात
.
1 चमचा कॉफी पावडरमध्ये 1-2 चमचे ताजे कोरफड जेल मिक्स करा. चेहऱ्याला 15-20 मिनिट्स लावा आणि मग चेहरा धुवा
.
चेहऱ्यावरील डागांपासून सुटका होण्यासाठी तुम्ही हा कॉफी आणि कोरफड जेलचा मास्क वापरू शकता
तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी कॉफी कोरफड जेल फेसमास्क उत्तम ठरेल
त्वचेवर साठलेली घाण दूर करण्यासाठी याचा उपयोग होतोच. याशिवाय डेड स्किन सेल्स काढण्यासही मदत मिळते
तुम्ही चेहऱ्यावरील टॅनिंगमुळे त्रासला असाल तर या फेसमास्कचा नियमित वापर करून टॅनिंग कमी करू शकता
त्वचेवरील उजळपणा वाढविण्यासाठी कॉफी आणि कोरफड जेल हे कॉम्बिनेशन वरदान ठरते
आपल्या त्वचारोगतज्ज्ञांच्या संमतीनुसार वापरा, आम्ही कोणताही दावा करत नाही