Published Sept 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
घरी आलेल्या या प्राण्यांना खायला घालाच!
हिंदू धर्मात प्राण्यांना देवासमान दर्जा दिला जातो. त्यामुळे घरी आलेल्या प्राण्यांना खायला देणे पुण्याचे मानले जाते
गाय ही हिंदू धर्मात पूजनीय असून घरासमोर आल्यास तिला चपाती खायला द्या, असे करणे शुभ असते
गाईच्या पोटात 33 कोटी देव सामावलेले असतात असा समज आहे, त्यामुळे तिला खाण्याशिवाय जाऊ देऊ नका
.
हनुमानाचे प्रतीक असणारे माकड हेदेखील पूजनीय आहे. घरात आलेल्या माकडाला खाणे देणे शुभ मानले जाते
.
माकडाला खायला देण्यात घरात सुख-समृद्धी टिकून राहते. माकडांचा अपमान करू नये
घरात काळ्या मुंग्या आल्यास त्यांना पीठ खायला देणे हे अत्यंत शुभ मानले जाते
मुंग्यांना खायला देण्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते असं म्हटले जाते
घरी खिडकीवर चिमणी आल्यास तिला पाणी, दाणे, तांदूळ खायला द्यावे
चिमणीला नियमित खायला देण्यात घरात आनंद टिकून राहतो असंही म्हटले जाते
सदर माहिती ही ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिली आहे, आम्ही कोणताही दावा करत नाही