www.navarashtra.com

Published Jan  25,  2025

By  Dipali Naphade

वजन कमी करण्यासाठी प्या माचा टी

Pic Credit - iStock

वजन कमी करण्यासाठी माचा टी हा एक चांगला पर्याय तुम्हाला सध्या उपलब्ध आहे, तसा करावा उपयोग जाणून घ्या

वजन कमी

माचा टी हा एक जपानी चहा असून ग्रीन टी च्या विशेष पानांपासून तयार होतो. हा तयार करण्याची प्रक्रिया मोठी असून यात अनेक पोषक तत्व आहेत

माचा टी

शरीरावरील चरबी विरघळविण्यासाठी माचा टी ची मदत होते. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थनुसार, यामुळे लिपोजेनेसिस कमी होऊन वेट लॉस होते

वेट लॉस

माचा टी बनविण्यासाठी 2 चमचा माचा पावडरमध्ये 2 कप पाणी घाला. नीट फेटा आणि थंड होऊ द्या

कसा बनवाल

थंड माचा टी मध्ये स्वादानुसार मध आणि बर्फाचे तुकडे मिक्स करून ढवळून घ्या आणि माचा टी तयार आहे

मध - बर्फ

माचा टी चे नियमित सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वाढते. ज्यामुळे फॅट्स कमी होऊन त्वरीत वजन कमी होते

मेटाबॉलिजम

माचा टी मध्ये आढळणारे घटक EGCG ब्लड प्रेशर नियंत्रणात आणते जे हृदयासाठी उत्तम ठरते

हार्ट

माचा टी मधील काही तत्वांमुळे त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्वचा अधिक उजळण्यास मदत मिळते

त्वचेसाठी

गरोदर महिलांनी अजिबात माचा टी चे सेवन करणे योग्य ठरणार नाही, याची दक्षता घ्या

कोणी पिऊ नये

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप