Olaला मागे टाकत Ampereची बाजी! EV मार्केटमध्ये मोठा उलटफेर

Automobile

12 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

1 ते 9 सप्टेंबरदरम्यान Ampereच्या 2,645 इलेक्ट्रिक स्कूटरची नोंदणी झाली. तर Ola Electricच्या 2,607 युनिट्सची नोंद झाली.

नेमकं काय घडलं?

Picture Credit : olaelectric

Ampereचा EV टू-व्हीलर मार्केटमध्ये 4.6% हिस्सा राहिला. Olaचा हिस्सा 4.5% होता. म्हणजेच Ampereने अगदी थोड्या फरकाने आघाडी घेतली.

फरक किती?

Picture Credit : ampere

सप्टेंबरच्या पहिल्या 9 दिवसांच्या आकडेवारीत Ampere पाचव्या क्रमांकावर पोहोचली. Ola Electricला सहाव्या स्थानावर जावे लागले.

Ampereची रँकिंग

Picture Credit : ampere

ऑगस्ट 2026 मध्ये Olaने 13,852 युनिट्स विकल्या होत्या. त्याच काळात Ampereच्या 8,613 युनिट्सची नोंदणी झाली.

ऑगस्टमध्ये चित्र वेगळं होतं!

Picture Credit : olaelectric

सप्टेंबरच्या पहिल्या 9 दिवसांतील Ampereची नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑगस्टच्या याच कालावधीच्या तुलनेतही Ampereची नोंदणी 66% अधिक होती.

Ampereची वाढ वेगवान

Picture Credit : ampere

Ampereकडे आता वेगवेगळ्या किंमत श्रेणीतील स्कूटर आहेत. Reo Vyb, Magnus Neo, Magnus G Max आणि Nexus यामुळे कंपनीचा ग्राहकवर्ग वाढवण्याचा प्रयत्न दिसतो.

Ampereची रणनीती

Picture Credit : ampere

ऑगस्ट 2026 मध्ये Olaच्या 13,852 युनिट्सची नोंदणी झाली. ऑगस्ट 2025 मधील 19,464 युनिट्सच्या तुलनेत ही सुमारे 28.8% घट आहे.

Olaच्या विक्रीला फटका

Picture Credit : olaelectric

सध्या Ampere फक्त 38 युनिट्सनी पुढे आहे. त्यामुळे संपूर्ण सप्टेंबरचा निकाल वेगळा असू शकतो. पण एक गोष्ट स्पष्ट आहे—Ola आणि Ampereमधील अंतर झपाट्याने कमी होत आहे

Ampereची आघाडी टिकणार का?

Picture Credit : ampere