www.navarashtra.com

Published  Nov 23, 2024

By  Sayali Sasane

Pic Credit - Instagram

अमृता खानविलकरचे हे ८ सुपरहिट चित्रपट; एकदा पहाच!  

अमृताने मराठी चित्रपट 'गोलमाल' मधून सिनेमा सृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट खूप कॉमेडी आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा आहे. 

गोलमाल

2010 मध्ये 'नटरंग' या मराठी चित्रपटातील मारुतीच्या लावणी नृत्य सादरीकरणाने तिला लोकप्रियता मिळाली. आणि ती पुढे चाहत्यांच्या पसंतीस आली.

नटरंग

मराठीतील लोकप्रिय चित्रपट 'सडे माडे तीन' प्रेक्षकांना लोटपोट हसवणारा आहे. या चित्रपटामधील अमृताचे पात्र खूपच मजेदार आहे.

सडे माडे तीन

अमृताने 'बाजी' या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदेसोबत काम केले आहे. दोघेही या चित्रपटामध्ये मुख्यभूमीकेत असून, दोघांचे काम प्रेक्षकांना खूप आवडले. 

बाजी

.

मराठीमधील धमाकेदार चित्रपटांच्या यादीत येणारा 'चोरीचा मामला' हा चित्रपट भरभरूर मनोरंजन करणारा आहे. यामध्ये अमृताची भूमिका खूपच वेगळी आहे. 

चोरीचा मामला

.

मराठी चित्रपट बस स्टॉप हा कॉलेजच्या मित्रांवर आधारित आहे. या चित्रपटात तुम्हाला अमृताचे डॅशिंग पात्र पाहायला मिळेल. 

बस स्टॉप

स्वप्नील जोशी आणि अमृताचा 'वेलकम जिंदगी' हा चित्रपट आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीवर आधारीत आहे. जो प्रेक्षकांना खूप आवडला. 

वेलकम जिंदगी

अमृताचा ब्लॉकब्लर चित्रपट 'चंद्रमुखी'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटामधील सगळी गाणी चाहत्यांनी डोक्यावर घेतली आहेत. 

चंद्रमुखी