180KM रेंज, 110kmph स्पीड! Oben Rorr Evo EV बाइकची दमदार एंट्री

Automobile

06 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

डिलिव्हरीला सुरुवात

Oben Rorr Evo ची ग्राहकांना डिलिव्हरी सुरू झाली असून लवकरच देशभरातील शोरूममध्ये ती उपलब्ध होणार आहे.

Picture Credit: Obenelectric

180KM पर्यंतची रेंज

या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 3.4kWh LFP बॅटरी असून IDC प्रमाणित 180KM रेंज आणि प्रत्यक्ष वापरात सुमारे 150KM पर्यंतचा प्रवास मिळू शकतो.

Picture Credit: Obenelectric

110kmph टॉप स्पीड

9kW मोटरमुळे बाइक 110kmph टॉप स्पीड गाठते. 0-40kmph वेग अवघ्या 3 सेकंदांत मिळतो.

Picture Credit: Obenelectric

90 मिनिटांत 80% चार्ज

फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी 0 ते 80% फक्त 90 मिनिटांत चार्ज होते.

Picture Credit: Obenelectric

प्रीमियम टेक्नॉलॉजी

–5-इंच TFT डिस्प्ले – Bluetooth – Navigation – OTA Updates – Geo-fencing – Fall Detection हे फीचर्स रायडिंगचा अनुभव अधिक आधुनिक बनवतात.

Picture Credit: Obenelectric

किंमत

Oben Rorr Evo ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.25 लाख आहे. लॉन्चनंतर अवघ्या 15 दिवसांत 25,000 हून अधिक बुकिंग्स मिळाल्याचा कंपनीचा दावा आहे.

Picture Credit: Obenelectric

कोणासाठी योग्य?

रोजचा प्रवास, लांब रेंज आणि स्मार्ट AI फीचर्स हवे असतील, तर Oben Rorr Evo हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Picture Credit: Obenelectric