अभिनेत्री रेखा यांच्या 'उमराव जान' या आयकॉनिक चित्रपटाची नुकतीच स्क्रिनिंग पार पडली.
Picture Credit: Instagram
चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी अख्ख्या बॉलिवूड इंडस्ट्रीने उपस्थिती लावली होती. अभिनेत्री अनन्या पांडेनेही हजेरी लावली होती.
स्क्रिनिंग दरम्यानचे फोटोज् अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
अनन्याच्या व्हाईट कलरच्या फुल्ल वेस्टर्न ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधले. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अंबाडा, केसांत गुलाब माळून आणि कानात झुमके असा लूक करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोपोजेस दिलेले आहेत.
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि रेड लिपस्टिक असा मेकअप करत अनन्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
अनन्याने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.