Published Jan 16, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Social Media
मातृत्व हे माणासांप्रमाणे इतर प्राण्यांमध्ये देखील पाहायला मिळतं.
असं म्हणतात की मुलांना जन्म देणं ही जगातली सगळ्यात सुंदर भावना असते.
काही प्राणी अंडी घालतात तर काही मुलांना जन्म देतात. मात्र प्रजननानंतर या प्राण्यांचा या प्राण्यांचा मृत्यू होतो.
मादी ऑक्टोपस प्रजनन काळात अंडी घालते. ही अंडी सुरक्षित राहावी म्हणून उपाशी राहते.
अंड्यातून जेव्हा पिल्ल जन्माला येतात तेव्हा शरीरात त्राण नसल्याने तिचा मृत्यू होतो.
सेमेमेशन हा समुद्राच्या तळाशी राहतो. सेलेमेशन मादीचा मुलांना जन्म दिल्यावर मृत्यू होतो.
सालमन मासा अंडी सुरक्षित राहावी यासाठी खूप लांबचा प्रवास करतात.
अंडी घातल्यानंतर मादी आणि नर यांच्यात शारीरिक बदल झाल्याने त्यांचा मृत्यू होतो.
मेफ्लाय किटकांचे जीवन अत्यंत लहान असते, आणि प्रजननानंतर काही तास किंवा दिवसांतच त्यांचा मृत्यू होतो.