www.navarashtra.com

Published  Jan 16, 2025

By  Shweta Chavan

सैफ अली खान किती कोटींचा मालक आहे? 

Pic Credit -pinterest

बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान चित्रपटांशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याची गणना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्समध्ये केली जाते.

सर्वात श्रीमंत 

सैफ अली खानच्या कमाईचा मुख्य स्त्रोत आहे तो म्हणजे त्याचे चित्रपट.

चित्रपट

.

सैफकडे वडिलोपार्जित संपत्ती तर आहेच, यासोबतच या अभिनेत्यानेही करोडोंची संपत्ती कमावली आहे.

करोडोंची संपत्ती

दरम्यान सैफ पतौडी घराण्याचा १०वा नवाब आहे आणि हा धाकटा नवाब शाही जीवनशैली जगतो.

१०वा नवाब

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खान जवळपास ११८० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.

मालक

अभिनयाव्यतिरिक्त, तो चित्रपटांच्या नफ्याचा वाटा, ब्रँड एंडोर्समेंट आणि वैयक्तिक गुंतवणूकीतून देखील कमावतो.

ब्रँड एंडोर्समेंट

सैफ अली खानचा वडिलोपार्जित राजवाडा हरियाणातील पतौडी येथे आहे. या आलिशान महालाची किंमत ८०० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येते.

पतौडी

सैफकडे आणखी दोन बंगले आहेत, ज्यांची रचना ऑस्ट्रियाच्या वास्तुविशारदांनी केली आहे. याशिवाय त्याचे मुंबईतही एक आलिशान अपार्टमेंटही आहे.

दोन बंगले

कार कलेक्शनमध्ये Audi, BMW 7 Series, Lexus 470, Mustang, Range Rover आणि Land Cruiser सारख्या लक्झरी कारचा समावेश आहे.

महागड्या गाड्या