Apache RTR 160 4V की Pulsar N160 SS? तुमचे पैसे कुठे वसूल होतील?

Automobile

20 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

टॉप-एंड Apache RTR 160 4V ची किंमत ₹1,39,440, तर Pulsar N160 SS ची ₹1,42,585 आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत.

किंमतीत किती फरक?

Picture Credit: bajajauto

नवीन Apache आणि Pulsar N160 SS दोन्हींना राऊंड प्रोजेक्टर LED हेडलॅम्प आणि LED DRLs मिळतात. Apacheचा फ्रंट थोडा अधिक आक्रमक दिसतो.

समोरून दोन्हींचा लूक भन्नाट!

Picture Credit: tvsmotor

दोन्ही बाईक्सना गोल्ड-फिनिश्ड इन्व्हर्टेड फ्रंट फोर्क मिळतो, ज्यामुळे त्यांचा प्रीमियम आणि स्पोर्टी लूक आणखी उठून दिसतो.

दोन्हींमध्ये Gold USD Fork!

Picture Credit: bajajauto

Apache RTR 160 4V मध्ये 159.7cc, 4-व्हॉल्व्ह इंजिन असून Sport मोडमध्ये 17.55PS पॉवर आणि 14.73Nm टॉर्क मिळतो.

Apacheमध्ये 159.7cc इंजिन

Picture Credit: tvsmotor

N160 SS मध्ये 164.9cc, 4-व्हॉल्व्ह इंजिन आहे. ते 18.5PS पॉवर आणि 14.4Nm टॉर्क देते. म्हणजे पॉवरच्या बाबतीत Pulsar पुढे आहे.

Pulsar N160 SS पॉवरमध्ये पुढे!

Picture Credit: bajajauto

दोन्ही बाईक्समध्ये TFT कन्सोल आणि कनेक्टिव्हिटी आहे. Apacheमध्ये Turn-by-Turn Navigation, तर Pulsar N160 SSमध्ये Google Maps Mirroring मिळते.

फीचर्समध्ये कोण भारी?

Picture Credit: tvsmotor

Apacheला स्लिम टेल आणि LED टेललॅम्प मिळतो, तर Pulsar N160 SSचा टेल सेक्शन अधिक मोठा असून Twin-strip LED टेललॅम्प मिळतो.

मागचा लूकही वेगळा!

Picture Credit: tvsmotor

Apacheचा आक्रमक लूक आणि स्पोर्टी कॅरेक्टर आकर्षक आहे, तर Pulsar N160 SS अधिक पॉवर आणि Google Maps Mirroringसारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्समुळे लक्ष वेधते.

Apache की Pulsar—तुमची पसंती कोणती?

Picture Credit: pinterest