Written By: Prajakta Pradhan
Source: pinterest
सनातन धर्मात अपरा एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूशी पूजा केली जाते.
पंचांगानुसार, 23 मे रोजी अपरा एकादशी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होऊ लागतात.
अपरा एकादशीची सुरुवात शुक्रवार, 23 मे रोजी रात्री 1.12 वाजता होईल. त्याची समाप्ती रात्री 23 मे ला रात्री 10.29 होईल.
अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. यामुळे जीवनात प्रगतीची शक्यता निर्माण होते आणि गरिबी दूर होऊ लागते.
अपरा एकादशीच्या दिवशी पूजेवेळी दही मिश्रीत पदार्थाचा नैवेद्य दाखवा. यामुळे आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.
भगवान विष्णूला केळी अर्पण करणे शुभ मानले जाते. याशिवाय तुम्ही पिवळ्या मिठाई अर्पण करू शकता कारण यामुळे भगवान नारायणाचा आशीर्वाद मिळतो.
अपरा एकादशीच्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करावीत, यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
अपरा एकादशीला भगवान विष्णूंना या गोष्टी अर्पण केल्यास व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. यासोबतच, पूर्वी रखडलेले कामही पूर्ण होऊ लागते.