आंबा प्रेमींसाठी खास, मँगो चॉकलेट रेसिपी

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

आंब्याचा सीजन आहे अशात तुम्ही आंब्यापासून टेस्टी चॉकलेट तयार करू शकता

आंबा चॉकलेट

हापूस आंबा सोलून त्याचा मिक्सरमध्ये गुळगुळीत गर करून घ्या. हवे असल्यास थोडी साखर घाला.

आंब्याचा गर

एका नॉनस्टिक पॅनमध्ये आंब्याचा गर घट्ट होईपर्यत मध्यम आचेवर ४-५ मिनिटे परतून घ्या.

गर गरम करा

डबल बॉयलर पद्धतीने किंवा मायक्रोवेवमध्ये चॉकलेट वितळवा. त्यात बटर घाला आणि चांगले मिसळा.

चॉकलेट वितळवा

थोडा थंड झालेला आंबा गर वितळलेल्या चॉकलेटमध्ये घालून नीट मिसळा.

आंबा आणि चॉकलेट

आवडीनुसार बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स मिश्रणात टाका आणि चॉकलेट साच्यामध्ये भरा

ड्रायफ्रूट्स 

हे मिश्रण छोटे छोटे चॉकलेट साच्यांमध्ये भरा किंवा ट्रेवर थापून चौकोनी तुकडे कापा.

साचा भरून थंड करा

चॉकलेट साचे फ्रिजमध्ये कमीत कमी १-२ तास सेट होण्यासाठी ठेवा आणि मग साच्यातून बाहेर काढून खाण्यासाठी सर्व्ह करा

फ्रिजमध्ये सेट करा