Published March 27, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
चैत्र पालवी म्हणजे गुढीपाडव्याला मराठी नववर्ष सुरु होतं.
गुढीपाडव्याचा हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो.
असं असलं तरी महाराष्ट्राशिवाय दाक्षिणात्य राज्यातही गुढीपाडवा वेगळ्या नावाने साजरा केला जातो.
याबाबत वेडींग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.
कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यात "उगादी" या नावाने गुढीपाडवा साजरा केला जातो.
उदागी हा युग आणि आदी या शब्दापासून तयार झाला आहे.
युग म्हणजे काळ आणि आदी म्हणजे सुरुवात. म्हणजेच काळाची सुरुवात.
हिंदू पुराणानुसार ब्रम्ह देवांनी या दिवशी सृष्टीची निर्मिती केली असं म्हणतात.
या दिवशी कडूनिंब आणि गुळाचा खडा खाल्ला जातो.
गोड आणि कडू या दोन्ही गोष्टी स्विकारणं गरजेचं आहे असा या प्रथेमागचा उद्देश आहे.