बाळासाठी आईचे दूध साठवायचे? ही 8 गॅझेट्स प्रत्येक नव्या आईला माहित असायलाच हवीत

Science Technology

18 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस म्हणजे बाळासाठी आईचे दूध हाताने किंवा ब्रेस्ट पंपच्या मदतीने काढून सुरक्षितपणे साठवण्याची प्रक्रिया. गरज पडल्यास हे दूध नंतर बाळाला देता येते.

ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस म्हणजे काय?

Picture Credit : Pinterest

हाताने चालवावा लागणारा हा पंप हलका, स्वस्त आणि अधूनमधून वापरणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे.

Manual Breast Pump

Picture Credit : Pinterest

बटण दाबताच दूध काढता येते. कमी मेहनत लागते आणि नियमित वापरासाठी हा पर्याय अधिक सोयीचा आहे.

Electric Breast Pump

Picture Credit : Pinterest

दोन्ही स्तनांमधून एकाच वेळी दूध काढता येते. वेळेची बचत होते आणि वारंवार पंपिंग करणाऱ्या मातांसाठी उपयुक्त ठरतो.

Double Electric Pump

Picture Credit : Pinterest

बाळ एका बाजूने दूध पित असताना दुसऱ्या बाजूने गळणारे दूध वाया न जाता सहज गोळा करता येते.

Silicone Milk Collector

Picture Credit : Pinterest

एक्सप्रेस केलेले दूध सुरक्षितपणे साठवण्यासाठी BPA-Free मिल्क स्टोरेज बॅग्स किंवा स्टोरेज बाटल्या वापरता येतात.

Milk Storage Bags

Picture Credit : Pinterest

पंपचे भाग, बाटल्या आणि निप्पल स्वच्छ व निर्जंतुक ठेवण्यासाठी स्टेरिलायझर उपयुक्त ठरतो.

Bottle Sterilizer

Picture Credit : Pinterest

प्रवासात किंवा ऑफिसमध्ये दूध सुरक्षित तापमानात ठेवण्यासाठी आईस पॅकसह कूलर बॅगचा वापर करता येतो.

Cooler Bag

Picture Credit : Pinterest

तुमच्या वापराची वारंवारता, आराम, बजेट आणि डॉक्टर किंवा लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला लक्षात घेऊन योग्य ब्रेस्ट पंप निवडा.

गॅझेट निवडताना लक्षात ठेवा

Picture Credit : Pinterest