सतत मोबाईल वापरल्यामुळे जडतात अनेक आजार

Life style

30 October, 2025

Author:  नुपूर भगत

सतत मोबाईलकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे l डोकेदुखी आणि दृष्टी कमजोर होण्याची शक्यता वाढते

दृष्टी कमजोर होते

Picture Credit: Pinterest

मोबाईल हातात धरून बसण्याने मान आणि खांद्यावर ताण येतो. त्यामुळे मान दुखी, पाठदुखी होऊ शकते.

पाठदुखी 

Picture Credit: Pinterest

झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने मेंदूला प्रकाशाचा परिणाम होतो आणि झोप नीट येत नाही. त्यामुळे निद्रानाश आणि थकवा निर्माण होतो

निद्रानाश

Picture Credit: Pinterest

 मोबाईलवर गेम्स खेळणे किंवा सोशल मीडियाचा वापर केल्याने मानसिक ताण वाढतो. त्यामुळे चिंता आणि नैराश्य वाढण्याची शक्यता असते.

मानसिक ताण

Picture Credit: Pinterest

मोबाईल सतत कानाजवळ ठेवून बोलल्याने कान दुखणे, आवाजात बदल आणि कधी कधी श्रवणशक्ती कमी होऊ शकते

कान दुखणे

Picture Credit: Pinterest

मोबाईलवरील जंतूंमुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. सतत मोबाईलला चेहऱ्याजवळ आणल्याने पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या वाढतात.

संसर्ग होऊ शकतो

Picture Credit: Pinterest

जास्त वेळ स्क्रीनसमोर बसल्याने एकाग्रता कमी होते आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड होते

एकाग्रता कमी होते

Picture Credit: Pinterest