कांदे सोलून बारीक चिरून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करा.
Picture Credit: Pinterest
गरम तेलात मोहरी आणि जिरे टाका. फोडणी तडतडल्यावर हळद घाला.
Picture Credit: Pinterest
यानंतर चिरलेला कांदा टाका आणि तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
कांदा परतल्यावर त्यात लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि मीठ घालून एक मिनिट परता.
Picture Credit: Pinterest
गॅस मंद करून थोडं थंड होऊ द्या. आता फेटलेलं दही त्यात घाला आणि लगेच हलक्या हाताने ढवळा.
Picture Credit: Pinterest
दही घातल्यानंतर भाजीला फार शिजवू नका, नाहीतर दही फाटेल. फक्त दोन मिनिटं मंद आचेवर उकळी येण्यापूर्वीपर्यंत गरम करा.
Picture Credit: Pinterest
शेवटी वरून कोथिंबीर टाकून दही कांदा भाजी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest