www.navarashtra.com

Published September 7, 2024

By Narayan Parab

गणेशोत्सवात घ्या अष्टविनायकांचे दर्शन

  Pic Credit- Social Media

अष्टविनायकांमध्ये सर्वात पहिला गणपती आहे मोरगावचा मयुरेश्वर  . अष्टविनायक यात्रेची सुरुवात येथूनच होते.

मयुरेश्वर

सिध्दटेकचा सिध्दिविनायक गणपतीचे मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यात्तील कर्जत तालुक्यात आहे.अष्टविनायकातील उजव्या सोंडेचा एकमेव गणपती

सिद्धिविनायक

बल्लाळेश्वर देवस्थान रायगडमधील पाली येथे आहे. मंदिराची बांधणी अशी आहे की, सूर्योदयाच्या वेळी गणपतीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात.

बल्लाळेश्वर

.

 वरदविनायक मंदिर रायगडमधील  महड येथे आहे. या मंदिरात १८९२ पासून अखंडदीप प्रज्ज्वलित आहे.

वरदविनायक

श्री चिंतामणी देवस्थान हे पुणे जिल्हातील थेऊर येथे आहे. सध्या असलेले मंदिर हे मोरया गोसावी यांनी बांधले.

चिंतामणी

गिरिजात्मज मंदिर लेण्याद्रीच्या गणेश लेण्यांमध्ये आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात हे मंदिर स्थित आहे.  

गिरिजात्मज

ओझर येथील विघ्नेश्वर देवस्थान पुण्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर आहे. चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराच्या कळसाला सोन्याने मढविले.

विघ्नेश्वर

रांजणगाव येथे श्री महागणपती देवस्थान आहे.दक्षिणायनाच्या काळात सूर्योदयाच्या वेळी श्रींच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात.

महागणपती

बाप्पाचा  आवडता उकडीचा मोदक आरोग्यासाठीही फायदेशीर