Written By: Shilpa Apte
Source: artist
काम वाढता वाढे असे होणार आहे, सर्वांची अपेक्षा पूर्ण करण्यात तुम्हाला यश मिळेल.
नवीन कामे सुरु करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. हळुहळु यशाच्या दिशेने वाटचाल करावी
प्रत्येक कामात नशिबाची साथ आहे पण काम करताना सतर्क राहा.
मुलांचे विवाह जुळवताना खूप अडचणी येत होत्या पण ते आता कमी होणार आहे.
घरासाठी खर्च करणार आहात त्यामुळे घरात सुखसमाधान देणाऱ्या वस्तू वाढतील.
ताणतणाव कमी होवून मन प्रसन्न राहील. योग आणि ध्यानधारणेवर फोकस करा, सकारात्मक विचार वाढतील
खूप मेहनत करता पण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो आहे. वाढत्या खर्चाला कंट्रोल करा.
कामात फोकस आणि नियोजन महत्त्वाचे आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमचे कौतुक करतील.
आर्थिक स्थिती उत्तम असल्याने गुंतवणुकिचा विचार करा, जोडीदारासोबत वेळ घालवाल
आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा ओढा जास्त असेल. जमीन किंवा मालमत्ता यांच्यातील वाद संपुष्टात येतील
तुम्ही जी काही चांगली कर्म केली आहेत त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे. पैसे येणं बाकी असेल ते मिळतील
उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील, नशिबाची साथ प्रत्येक कामात असेल. जास्तीची गुंतवणूक लाभदायक ठरेल