8Published March 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
बोलतांना वाणीत गोडवा ठेवाल. गायक लोकांचे कौतुक केले जाईल.
गोड बोलून कार्यभाग साधता येईल. प्रलोभनाला बळी पडू नका
.
जोडीदाराच्या सौख्यात रममाण व्हाल. स्पष्टपणे बोलणे टाळावे. फसवणुकीपासून सावधान
मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, हौस मौज पूर्ण करून घ्याल. स्त्रियांच्या सहवासात वावराल.
जोडीदाराबरोबर मनमोकळी चर्चा कराल. काही कामे अकारण खोळंबतील
सर्वांना सहृदयतेने मदत कराल. नातेवाईकांशी विसंवाद टाळावा
प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत
पत्नीचे विचार आग्रही वाटू शकतात. प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल
भावंडांची मदत घेता येईल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल.
काही गोष्टींचा सारासार विचार करावा. फार खोलात जाऊन अर्थ काढू नयेत.
तुमचा अंदाज बरोबर ठरेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल, वादविवादात पडू नका
दिवसभर कामात व्यग्र राहाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका. फसव्या लोकांपासून दूर राहावे