8Published March 31, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
हवामानानुसार काही बदल करावेत. महत्त्वाची कामे पार पडतील
.
काही क्षणिक आनंद घ्याल. जबाबदारी सक्षमपणे पेलाल, जोडीदाराचे मत जाणून घ्यावे.
कौटुंबिक नाराजी दूर करावी. सार्वजनिक कामात कौतुक केले जाईल.
कलाकारांच्या कलेचे कौतुक केले जाईल. सांधेदुखीचा त्रास संभवतो.
आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी राहतील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे
सारासार विचारातून कृती करावी. देणी फेडता येतील
वैवाहिक सौख्यात मिठाचा खडा पडू देऊ नका. मनोरंजनाचे बेत आखले जातील.
आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. धार्मिक कामात मन गुंतवावे.
जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. गरज पडल्यास शांत राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सामुदायिक गोष्टींचे भान ठेवावे.
खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सडेतोडपणे मत मांडाल