महाग Avocado vs स्वस्त पेरू: पैशांचा खर्च कुठे योग्य?

Lifestyle

21 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दोन्ही फळं आहेत पौष्टिक!

Avocado आणि पेरूमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि विविध पोषक घटक असतात. मात्र दोन्हींचे nutritional benefits वेगळे आहेत.

Picture Credit: Pinterest

100 ग्रॅम Avocadoमध्ये काय?

सुमारे 160 कॅलरीज, 6.7 ग्रॅम फायबर आणि 15 ग्रॅम फॅट असते. यातील बहुतांश फॅट हे unsaturated fat असते.

Picture Credit: Pinterest

पेरू मध्ये किती Calories?

100 ग्रॅम पेरूमध्ये सुमारे 68 कॅलरीज आणि 5.4 ग्रॅम फायबर असते. त्यामुळे कमी कॅलरीजमध्ये चांगले पोषण मिळते.

Picture Credit: Pinterest

Vitamin C मध्ये पेरू पुढे!

पेरू हे Vitamin C चे उत्कृष्ट स्रोत आहे. 100 ग्रॅम Guavaमध्ये Vitamin C चे प्रमाण Avocadoपेक्षा अनेक पटींनी जास्त असते.

Picture Credit: Pinterest

Avocadoचा खास फायदा काय?

Avocadoमध्ये healthy fats जास्त असल्याने ते अधिक calorie-dense आहे. फायबरसोबत हे फळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करू शकते.

Picture Credit: Pinterest

पेरूचा खास फायदा काय?

पेरूमध्ये Vitamin C भरपूर असून फायबरही चांगल्या प्रमाणात मिळते. रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येणारे फळ म्हणून ते उपयोगी आहे.

Picture Credit: Pinterest

Avocadoऐवजी पेरू चालेल का?

काही पोषक घटकांसाठी पेरू उत्तम पर्याय आहे. पण Avocadoमधील healthy fats Guavaमध्ये नसल्यामुळे दोन्ही फळे nutritionalदृष्ट्या एकसारखी नाहीत.

Picture Credit: Pinterest

मग कोणतं फळ खावं?

Healthy fats हवे असतील तर Avocado; Vitamin C आणि कमी calories हवे असतील तर Guava. शक्य असेल तर आहारात दोन्हींचा समावेश करा!

Picture Credit: Pinterest