२४ ऑगस्टला Pulsarचा मोठा धमाका! नवीन 125 आणि 150 येणार

Automobile

21 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Bajaj Pulsar 125 आणि Pulsar 150 च्या नवीन जनरेशन मॉडेल्सची 24 ऑगस्टला एँट्री होणार आहे! दोन्ही बाईक्समध्ये मोठे अपडेट्स पाहायला मिळू शकतात.

Pulsar चाहत्यांसाठी मोठी बातमी!

Picture Credit:pinterest

नवीन Pulsar 125 आणि 150 मध्ये फक्त लूक बदलणार नाही, तर डिझाइन, इंजिन, चेसिस आणि फीचर्समध्येही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.

फक्त फेसलिफ्ट नाही!

Picture Credit:pinterest

नवीन Pulsar 125 च्या स्पाय शॉट्समध्ये अधिक शार्प आणि मस्क्युलर लूक दिसला आहे. फ्युएल टँक आणि टेल सेक्शनमध्ये बदल अपेक्षित आहेत.

डिझाइन होणार आणखी स्पोर्टी

Picture Credit:pinterest

बाईकमध्ये Pulsarची ओळख कायम ठेवत नवीन टेल डिझाइन आणि स्प्लिट टेललाइट्सचा अपडेटेड सेटअप मिळू शकतो. त्यामुळे जुन्या Pulsarपेक्षा नवीन मॉडेल अधिक आधुनिक दिसेल.

Pulsarचा आयकॉनिक लूक कायम!

Picture Credit:pinterest

नवीन जनरेशन Pulsar 125 मध्ये अपडेटेड इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे परफॉर्मन्ससोबतच रिफाइनमेंट आणि रोजच्या वापरावरही लक्ष दिले जाऊ शकते.

नवीन इंजिनची चर्चा

Picture Credit:pinterest

Bajajने नवीन Pulsarमध्ये केवळ इंजिनवर काम न करता अंडरपिनिंग्स आणि चेसिसमध्येही बदल करण्याची तयारी केली आहे. यामुळे रायडिंग डायनॅमिक्समध्ये फरक पडू शकतो.

चेसिसमध्येही बदल

Picture Credit:pinterest

नवीन Pulsar 125 आणि 150 मध्ये जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत अधिक आधुनिक फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे कम्यूटर सेगमेंटमध्ये बाईक्सची स्पर्धात्मकता वाढू शकते.

फीचर्समध्येही अपग्रेड

2026 Pulsar 125 ची अंदाजे किंमत ₹90,000 असल्याचे BikeDekhoने नमूद केले आहे. मात्र अंतिम एक्स-शोरूम किंमत लाँचवेळीच स्पष्ट होईल.

किंमत किती असेल?

Picture Credit:pinterest

नवीन Pulsar 125 चा सामना TVS Raider आणि Honda SP 125 सारख्या लोकप्रिय 125cc बाईक्सशी होण्याची शक्यता आहे.

कोणाशी होणार टक्कर?

Picture Credit:pinterest

नवीन Pulsar 125 आणि Pulsar 150 मध्ये नेमके कोणते इंजिन, फीचर्स आणि किंमत मिळते, याचा खुलासा २४ ऑगस्टला होईल.

24 ऑगस्टला होणार खुलासा!

Picture Credit:pinterest