दैनंदिन प्रवासासाठी Bajaj Auto नवीन 125cc Commuter बाईक आणण्याच्या तयारीत आहे.
Picture Credit: pinterest
125cc सेगमेंटमध्ये वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी नव्या मॉडेलवर काम करत आहे. या बाइकमुळे ग्राहकांना आणखी एक पर्याय मिळू शकतो.
ही बाइक रोज ऑफिस, कॉलेज आणि शहरातील प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे.
या मॉडेलमध्ये 125cc क्षमतेचे इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये चांगला मायलेज आणि स्मूथ परफॉर्मन्सवर भर असू शकतो.
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LED लाइटिंग, USB चार्जिंग पोर्ट आणि आधुनिक डिझाइनसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
नवीन Bajaj बाइकची स्पर्धा Hero Super Splendor XTEC, Honda Shine 125, TVS Raider 125 आणि Hero Xtreme 125R सारख्या लोकप्रिय मॉडेल्सशी होऊ शकते.
कंपनीने अद्याप अधिकृत लाँच तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, आगामी काळात या बाइकमधील अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.
अधिकृत किंमत जाहीर झालेली नसली तरी, 125cc Commuter सेगमेंटमध्ये स्पर्धात्मक दरात ही बाइक सादर केली जाऊ शकते.
जर Bajaj ने आकर्षक किंमत, चांगले मायलेज आणि आधुनिक फीचर्स दिले, तर ही नवीन 125cc बाइक भारतीय ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.