तमालपत्राचे आर्श्चयकारक फायदे, असा करा वापर

Life style

19 January, 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाणारे मसाल्यांमध्ये औषधीय गुणधर्म असतात. त्यामुळे याचा वापर करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

भारतीय मसाले

पुलावापासून बिर्याणीपर्यंत आणि रस्सा भाजीसाठी याचा वापर केला जातो. यामध्ये कॅल्शियम, कॉपर, विटामिन ए, आयरन, विटामिन सी यांसारखे गुणधर्म असतात.

तमालपत्राचे गुणधर्म 

तमालपत्राचे फायदे 

तमालपत्र जेवणाची चव वाढवतो.  मात्र याचा वापर आजुन विविध प्रकारे केला जातो. त्वचेपासून मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

ताण कमी होईल

तमालपत्र जाळून त्याचा धूर घरामध्ये करा. त्यामुळे ताण कमी होतो. कारण जेव्हा आपण तमालपत्र जाळतो तेव्हा त्यातून एक रसायन बाहेर पडते जे मूड वाढवण्यासाठी फायदेशीर असते.

तमालपत्राचे पाणी

तमालपत्राचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पचन सुधारण्यास मदत होते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्याव्यतिरिक्त, ते शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करते.

त्वचेसाठी फायदेशीर तमालपत्र

तुम्ही तमालपत्र पाण्यात उकळून ते पाणी टोनर म्हणून वापरू शकता किंवा वाफ घेऊ शकता. ज्यामुळे डाग आणि मुरुम यासारख्या समस्या कमी होतात.

डास दूर करण्यासाठी

डासांना दूर ठेवण्यासाठी तमालपत्र देखील खूप उपयुक्त आहे. एका भांड्यात 4 ते 5 तमालपत्र घेऊन त्यात 2-3 थेंब मोहरीचे तेल, कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर करा.