श्रावण महिना सुरू झाला की घरात पूजा, व्रत-वैकल्ये आणि सणांची लगबग सुरू होते. या काळात दारासमोर सुंदर रांगोळी काढून घराची शोभा वाढवण्याची परंपरा आहे.
Picture Credit: Pinterest
श्रावणात दारासमोर कमळाची रांगोळी काढा. कमळ हे पवित्रतेचे आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. रंगीत फुलांच्या पाकळ्यांनी किंवा रांगोळीच्या रंगांनी ही डिझाइन अधिक आकर्षक करता येईल.
Picture Credit: Pinterest
स्वस्तिक हे शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. दारासमोर स्वस्तिकाभोवती छोटे ठिपके, फुले आणि वेलबुट्टी काढून सुंदर रांगोळी तयार करता येईल.
Picture Credit: Pinterest
श्रावणातील हिरवाई आणि पावसाळ्याच्या वातावरणाला साजेशी मोराची रांगोळी दारासमोर काढा. निळा, हिरवा आणि पिवळा रंग वापरल्यास रांगोळी अधिक खुलून दिसेल.
Picture Credit: Pinterest
वेगवेगळ्या आकारांची फुले, पाने आणि वेलबुट्टी वापरून साधी पण आकर्षक रांगोळी काढा. ही रांगोळी कमी वेळात तयार होते आणि दाराची शोभाही वाढवते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
दारापासून देवघराच्या दिशेने लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. शुभ प्रसंगी ही रांगोळी विशेष आकर्षक दिसते.
Picture Credit: Pinterest
श्रावणात रांगोळी काढताना पारंपरिक डिझाइनसोबत स्वतःच्या कल्पकतेचा वापर करा. सुंदर रांगोळी, स्वच्छ अंगण आणि भक्तिमय वातावरणामुळे श्रावणातील सणांचा आनंद आणखी वाढतो.