ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला १४ जुलैला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) पृथ्वीवर परतणार
परतीच्या काही दिवस आधी त्यांनी आणि त्यांच्या क्रू मेंबर्सनी अंतराळात पार्टी केली.
शून्य गुरुत्वाकर्षणात तरंगत त्यांनी जेवणाचा आनंद घेतला, याचे फोटो समोर आले आहेत.
नासाने सांगितले की अॅक्सिओम-४ मिशनचे अनडॉकिंग १४ जुलैला होईल.
शुक्ला हे ISS मध्ये गेलेले पहिले भारतीय ठरले आहेत
त्यांनी ‘आकाशगंगा’ मोहिमेअंतर्गत एकूण सात प्रयोग पूर्ण केले आहेत
शेवटच्या टप्प्यात त्यांनी हरभरा आणि मेथी पेट्री डिशमध्ये पिकवली.
हे प्रयोग ISS च्या फ्रीजरमध्ये ठेवले गेले असून त्यांचे फोटोही शेअर करण्यात आले
सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वनस्पतींच्या वाढीवर कसा परिणाम करते हे शोधण्याचा उद्देश होता.
यामुळे गगनयानसारख्या भविष्यकालीन मानवी मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.