हिंदू धर्मात शंखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शंखाचे धार्मिक, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक तिन्ही फायदे आहेत
शंखाच्या ध्वनीमुळे घरातील नकारात्मक उर्जा कमी होऊन सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. घरात सुखशांती येते
शंखातून येणाऱ्या ध्वनीमुळे वातावरणातील किटाणू आणि जीवाणू नष्ट होऊन हवा शुद्ध होते
शंख वाजवल्याने एकाग्रता वाढते आणि मनःशांती मिळते. तणाव-चिंता कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरते
शंख वाजवताना फुफ्फुसावर जोर येतो आणि त्यामुळे कार्यक्षमता वाढून फुफ्फुस मजबूत होते
नियमित शंखनादामुळे घरात समृद्धी येऊन लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे
शंखात पाणी भरून ठेवले आणि सकाळी पिण्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. विशेषतः पोटाच्या समस्येसाठी लाभदायक आहे
आपल्या परंपरेशी जोडून ठेवण्यासाठी आणि धार्मिक भावना जपण्यसाठीही शंखनाद केला जातो