www.navarashtra.com

Published  August 11, 2024

By  Shubhangi Mere 

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे, आज तिच्या कुस्तीचा प्रवास कसा होता यावर एकदा नजर टाका.

विनेश फोगाट हिचा जन्म २५ ऑगस्ट १९९४ रोजी  हरियाणामध्ये चरखी दादरी या गावामध्ये कुस्तीपटूंच्या कुटूंबामध्ये झाला आहे. 

जन्म

विनेश फोगाट हिचे वडील राजपाल सिंग यांना त्यांच्या घरासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.

वडिलांची हत्या

प्रसिद्ध दंगल चित्रपटातील महावीर सिंह फोगाट यांच्याकडून लहानपणापासून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले आहे. 

काकांकडून प्रशिक्षण

.

आशियाई चॅम्पियनशिप २०१४ मध्ये तिने मेडल मिळवले होते, या स्पर्धेमध्ये तिने एकूण ८ पदक मिळवले आहेत.

पहिले आंतरराष्ट्रीय मेडल

२०१२ मध्ये विनेश फोगाटने जागतिक कुस्ती स्पर्धामध्ये कांस्य पदक मिळवले होते. 

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक

कुस्तीपटू विनेश फोगाटने कॉमनवेल्थ गेम्स २०१४ सुवर्ण पदक आणि २०१८ मध्ये सिल्वर मेडल मिळवले होते. 

कॉमनवेल्थ गेम्स 

विनेश फोगाटने कुस्तीपटू सोमवीर राठीसोबत १३ डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केले होते. 

सोमवीर राठीसोबत लग्न

विनेश फोगाट ही आतापर्यत ३ वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. यामध्ये ती २०१६, २०२० आणि २०२४ मध्ये ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती.

तीन वेळा ऑलिम्पियन

रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच सामन्यात गंभीर दुखापतीमुळे तिला स्पर्धेमधून बाहेर जावे लागले होते. 

रिओ ऑलिम्पिक २०१६

टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने तिचा पहिलाच सामना गमावल्यामुळे ती स्पर्धेमधून बाहेर झाली होती. 

टोकियो ऑलिम्पिक २०२०

विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारी पहिली महिला ठरली आहे. परंतु तिला १०० ग्राम ओव्हरवेटमुळे डिसक्वालिफाय करण्यात आले. 

पॅरिस ऑलिम्पिक २०२४