भारतात वर्षानुवर्षे हळद केवळ मसाल्याच्या पदार्था म्हणूनच नव्हे तर आयुर्वेदिक औषध म्हणून देखील वापरली जात आहे. यामध्ये अनेक गुणधर्म आहेत.
Picture Credit: Pinterest
जेव्हा तुम्ही हळदीमध्ये मिसळलेले दूध पिता तेव्हा मसाल्यातील घटक, कर्क्यूमिन, त्यात विरघळते. दुधामध्य फॅट असते. हळदीच्या दुधाचे फायदे मिळविण्यासाठी त्यात काळी मिरी टाकावी.
Picture Credit: Pinterest
काळी मिरी असा मसाला आहे त्यामध्ये विटामीन सी असते. यामुळे तुम्ही हळदीच्या दुधातून प्यायलात तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याचे काय आहेत फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
ज्या लोकांना वारंवार सर्दी खोकला होतो त्यांनी रोज हळद आणि काळी मिरी टाकून दूध प्यावे. या दोन्ही मसाल्यांमधील घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
Picture Credit: Pinterest
हळदीमध्ये ॲण्टीइंफ्लोमेटरी गुण असतात. यामुळे सूज कमी होते. तसेच दुधामध्ये कॅल्शिअम असते आणि हे हाडं मजबूत ठेवण्यास मदत करते. सांधेदुखीसाठी हे पिणे खूप फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
हळद आणि काळी मिरीमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. पण जर एखाद्याला लैक्टोज असहिष्णुता असेल तर तो पचन सुधारण्यासाठी हळद आणि काळी मिरी मिसळलेले पाणी पिऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
तुमची त्वचा उजळवण्यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करण्याऐवजी, तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करणे चांगले. काळी मिरी दुधात व्हिटॅमिन सी असते आणि हे घटक आपल्या त्वचेला चमक देते.
Picture Credit: Pinterest