मेथी दाणे पाणी पिण्याचे आरोग्याला अनेक लाभ मिळतात, त्याप्रमाणेच केसांनाही हे पाणी लावण्याचे फायदे आहेत
मेथी दाण्यात लोह, फोलिक अॅसिड, कॅल्शियम, विटामिन सी, ए आणि के पोषक तत्व आढळतात
मेथी पाण्याने केसांची वाढ होण्यास मदत मिळते. तसंच केस लांबसडक आणि घनदाट होतात. या पाण्याने केसही धुऊ शकता
आपल्या स्काल्पसाठी तुम्ही मेथी पाण्याचा वापर करावा, यामुळे केसातील कोंडा निघून जाण्यास मदत मिळते
मेथीच्या पाण्यात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असून स्काल्प हेल्दी राहतो आणि खाजही येत नाही
केसांना योग्य पोषण नसल्यास अनेक समस्या उद्भवतात. मात्र, मेथी पाण्याने केस धुतल्याने योग्य पोषण मिळते
खराब खाण्यापिण्याने केस खराब होऊन केसगळती होते. मेथी पाण्याने केस धुतल्यास मुळापासून मजबूत होतात
केसांना मऊपणा येण्यासाठी तुम्ही मेथीच्या पाण्याचा वापर करू शकता. यामुळे केसांचा कोरडेपणाही दूर होतो
आम्ही कोणताही दावा करत नाही, ब्युटिशियनचा सल्ला घ्यावा