हिंदू धर्मामध्ये तुळस लक्ष्मी आणि विष्णू यांना प्रिय मानली जाते. ज्यावेळी तुळशीच्या पानांना चंदन लावून ते मंदिरात ठेवले जाते तेव्हा त्याची ऊर्जा वाढते.
शास्त्रानुसार विष्णूंना नैवेद्य तुळशीशिवाय दाखवला जात नाही. चंदन लावून तुळस अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो.
चंदन शीतलता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तुळशीवर चंदन लावल्याने त्यांचा सुगंध येतो. हा सुगंध घर शुद्ध करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो.
तुळशीच्या पानांना चंदन लावून ते देवाच्या पायाशी अर्पण करणे प्रतीक मानले जाते. यामुळे भक्ताचे मन शांत राहते.
तुळशीचा संबंध बुध ग्रहाशी आहे जो बुद्धी आणि व्यवसायाचा कारक आहे. तर चंदनाचा संबंध चंद्र आणि गुरू ग्रहाशी संबंधित आहे. याचा संबंध बुद्धिमत्ता आणि मनाशी आहे.
तुळशीच्या पानांना चंदन लावून मंदिरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो. नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरामध्ये शांततेचे वातावरण राहते.
जर कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर चंदनामुळे मानसिक ताण, चिंता आणि अस्वस्थता दूर होते. यामुळे मन प्रसन्न आणि शांत राहते.
तुळशीच्या पानांना चंदन लावल्याने राहू केतूचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. घरातील वाद, आजारपण आणि आर्थिक समस्या दूर होतात.
रोज सकाळी तुळशीच्या पानांना चंदन लावून मंदिरात ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा जप करावा. संध्याकाळी दिवा लावावा.