दात अचानक दुखायला लागला तर ते सहन करणं अशक्य असतं. अशावेळी त्वरीत घरगुती उपाय रामबाण ठरतात
लखनौच्या केअर इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेसच्या MD फिजिशियन डॉक्टर सीमा यादव यांनी सोपे उपाय सांगितले
हिंगात अँटीबॅक्टेरियल गुण असून पाणी मिक्स करून पेस्ट करा आणि कापसाने दाताला लावा, त्वरीत त्रास कमी होईल
लवंत तेलात अँटीसेप्टिक गुण असून कापूस भिजवून दातावर लावा आणि दिवसातून 3-4 वेळा असं केल्याने सूज जाईल
लसूण पेस्टमध्ये सैंधव मीठ मिक्स करा आणि दातावर लावा. कॅव्हिटी आणि प्लाकसाठी फायदेशीर ठरते
कोमट पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करून गुळण्या करा यामुळे बॅक्टेरिया मरून दात स्वच्छ राहतात
1 चमचा दालचिनी पावडरमध्ये थोडेसे मध घाला आणि ही पेस्ट दातावर लावा. थोड्या वेळाने चूळ भरा, यामुळे आराम मिळेल
2 थेंब पेपरमिंट ऑईल कोमट पाण्यात मिक्स करून चूळ भरा. नैसर्गिक पेनकिलर म्हणून याचा दातावर उपयोग होतो
आल्याच्या पावडरमध्ये पाणी मिक्स करून पेस्ट दातावर लावा किंवा आल्याचा तुकडा दुखऱ्या दातावर ठेवा, लवकर आराम मिळेल
आपल्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही