www.navarashtra.com

Published Jan 18,  2025

By  Mayur Navle

दूधात वेलची टाकून प्यायल्याने  काय होईल?

Pic Credit -  iStock

दूध आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे हे आपण सर्वच जाणतो. पण त्यात वेलची टाकल्याने हे फायदे वाढू शकतात.

दूध आणि वेलची

वेलचीच्या गुणधर्मांमुळे पचनसंस्था मजबूत होते आणि अपचन, गॅस, किंवा पोटफुगीसारख्या समस्यांवर  आराम मिळतो.

पचन सुधारते

वेलचीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात.

दाह कमी होते

वेलचीच्या सुगंधामुळे मन शांत राहते आणि झोप चांगली लागते. तसेच  तणाव कमी होतो.

ताणतणाव कमी होतो

वेलची रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदय आरोग्य  टिकून राहते.

हृदयाचे आरोग्य सुधारते

वेलचीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे सर्दी, खोकला आणि दमा यासारख्या श्वसनाच्या समस्या कमी होतात.

श्वसनसंस्था मजबूत होते

वेलचीचे घटक मेटाबॉलिझम वाढवतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास  मदत मिळते.

वजन नियंत्रण

वेलचीचा उपयोग दुर्गंधी कमी करण्यासाठी होतो आणि तोंडाच्या संसर्गांवर उपचार करण्यास मदत होते.

तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर