Published Dev 03, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
तूप आरोग्यासाठी उत्तम ठरते. तूप नियमित खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि थकवा वा अशक्तपणा दूर होतो
पण त्वचेला देशी तूप लावणे किती फायदेशीर ठरते तुम्हाला माहीत आहे का? चेहऱ्यावर तूप लावल्याने अनेक समस्या दूर होतात
चेहऱ्यावर उजळपणा येऊन रंगाचा पोत सुधारण्यासाठी तुम्ही त्वचेवर तुपाचा वापर करू शकता. रोज सकाळी तुम्ही चेहऱ्यावर तूप लावावे
त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असेल तर तूप वापरावे. देशी तूप चेहऱ्याला लावल्याने डागाचा त्रास कमी होतो
चेहऱ्यांवरील पुळ्या, मुरूमांचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही नियमित रोज तुपाचा चेहऱ्यावर वापर करावा. तूप हे त्वचेला मॉईस्चराईज करते
तुमची त्वचा कोरडी असेल तर आपल्या चेहऱ्यावर तुपाचा वापर करणे उत्तम ठरते कारण त्वचा अधिक हायड्रेट राहते
.
1 चमचा तूप घ्या आणि चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने 2-3 मिनिट्स मसाज करा आणि 10-15 मिनिट्सने धुवा
.
आपल्या ब्युटिशियनचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही
.