शरीर निरोगी ठेवण्यात वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांचे रस महत्त्वाची भूमिका बजावतात. यातीलच एक गाजर आणि आल्याचा रस आहे
जर तुम्ही रोज गाजर आणि आल्याच्या रसाचे सेवन केल्यास तुम्हाला काय फायदे होतील, जाणून घ्या
आल्यामध्ये व्हिटॅमीन, कॅल्शिअम, आयरन, मॅग्नीज इत्यादी अनेक गुण असतात. हे शरीराला निरोगी ठेवतात.
गाजरामध्ये व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के, फायबर, पोटॅशियम यांसारखे पोषक तत्व असतात.
जर तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये गाजर आणि आल्याच्या रसाचा समावेश केल्यास हाडं मजबूत राहण्यास मदत होईल. कारण त्यामध्ये कॅल्शिअम असते.
बहुतेकदा आपली प्रतिकारकशक्ती कमकुवत होत जाते. प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी गाजर आणि आल्याचा रस फायदेशीर ठरतो.
ज्या लोकांना हृद्याचा त्रास होतो त्या लोकांनी गाजर आणि आल्याचा रस पिणे फायदेशीर आहे.
डोळे चांगले ठेवण्यासाठी गाजर आणि आल्याच्या रसाचे सेवन करणे सर्वोत्तम मानले जाते.