सुकामेवा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. हे खायला खूप चविष्ट असते. यामुळे अनेक समस्या दूर होतात.
मधात भिजवलेले बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कोणते फायदे होतात ते जाणून घ्या
बदामामध्ये फायबर, व्हिटॅमीन ई, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, आयरन आणि पोटॅशिअम यांसारखे प्रथिने असतात
मधामध्ये ग्लुकोज, व्हिटॅमीन बी 6, व्हिटॅमीन सी, कॅल्शिअम, आयरन, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयरन इत्यादी प्रथिने असतात.
ज्या लोकांना हृद्याच्या संबंधित आजार आहेत त्यांनी मधात भिजवलेले बदाम खावे. कारण त्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण असते
हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशा वेळी मधात भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्यामध्ये व्हिटॅमीन सीचे प्रमाण असते.
मध आणि बदाम दोन्हींमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. कॅल्शिअम हाडांसाठी फायदेशीर मानले जाते. अशा वेळी तुम्हाला मधात भिजवलेले बदाम खावे.
मधात भिजवलेले बदाम खाताना या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे की, ते मर्यादित प्रमाणात खावे. जास्त खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते.