Written By: Prajakta Pradhan
Source: pinterest
खजूर हे पोषक तत्वांनी समृद्ध असलेले कोरडे फळ मानले जाते. खजूरामध्ये व्हिटॅमिन, फायबर यांसारखे गुण आहेत.
खजूर हे एक फळ आहे जे शरीराला भरपूर ऊर्जा प्रदान करते. त्यात नैसर्गिक साखर आढळते, जी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
खजुरामध्ये फायबरचे गुण असतात जे पचन संस्था मजबूत ठेवण्यास मदत करते. हे शरीरातून बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्या हळूहळू दूर करण्यास मदत करते.
खजूरमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते जे अशक्तपणा रोखण्यास मदत करते. त्याचसोबतच हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते.
खजूरामध्ये कॅल्शिअम असते जे हाडं मजबूत करण्यास मदत करतात. ऑस्टियोपोरोसिस आणि हाडांशी संबंधित समस्या टाळण्यास देखील उपयुक्त आहे.
खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. ते त्वचेला हेल्दी बनवतात.
खजूरामध्ये मॅग्नेशियमची मात्रा असते जे तणाव कमी करण्यास मदत करते. जे शरीराला आराम देणे आणि झोपेच्या समस्येपासून सुटका करते.
खजूरामध्ये पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.